पूर्णेतील ७९ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत २२ एप्रिलला
सोडतीसाठी तहसील कार्यालयात सर्वांनी उपस्थित रहावे -तहसीलदार माधवराव बोथिकर
पूर्णा( प्रतिनिधी)
तालुक्यात आगामी पाच वर्षात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची संख्या वाटप करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी पूर्णा तहसील कार्यालयात ता.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. तरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या निवडून आलेल्या सदस्य व नागरिकांनी या सोडतीस उपस्थित राहावे असे आवहान तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम २(अ)चे उपनियम ३ (ब)व (४) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ता.७ एप्रिल रोजी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यासह पुढील पाच वर्षासाठी सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ग्रामपंचायत निहाय निश्चित करण्यासाठी तहसीलदार यांना अधिकार प्रदान केले आहेत. त्या अनुषंगाने सरपंच व उपसरपंच पदाचे आरक्षण प्रक्रिया व सोडतीची कारवाई करण्यासाठी मंगळवार ता.२२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय पूर्णा येथे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात येणार आहे तरी या ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी या सोडतिला उपस्थित रहावे असे आवाहन पूर्णा तालुका निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी केले आहे.———————————————पूर्णा तालुक्यातील अनुसूचित जाती(sc) साठी आरक्षित सरपंच पदे १२ व महिला साठी ६, अनुसूचित जमातीसाठी(st) एक महिला व एक खुला, नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी(obc) नामाप्र २१ महिला ११ खुल्या प्रवर्गासाठी (open) खुला ४५ व महिला २३ असे तालुकानिहाय आरक्षण ठरले आहे.