श्री.गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love

पूर्णा ता.२१(प्रतिनिधी)

श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासन शिबिराजे आयोजन करण्यात आले होते , यावेळी प्रशिक्षक सतीश बरकुंटे यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक सर्व कर्मचाऱ्यांना करून दाखवले तसेच सर्वांना त्यात सहभागी करून घेतले यावेळी प्रा. चारुदत्त डाफणे यांनी प्राणायाम कसा करावा याचे प्रशिक्षण दिले, योग दैनंदिन जीवनाचा भाग झाला पाहिजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी त्याचा उपयोग होईल असे प्राचार्य डॉ के राजकुमार यांनी म्हटले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अजय कुर्हे यांनी केले आभार डॉ जी पी कापुरे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ शिवसांब कापसे, डॉ गजानन कुरुंदकर,पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी ,श्री राजेश धूत,डॉ रवी बरडे, डॉ जितेंद्र पुल्ले, डॉ संजय दळवी,, डॉ शेषराव शेटे, डॉ प्रकाश भांगे,डॉ आर आर राख, डॉ बी बी मुसळे,श्री बी पी कुलकर्णी, श्री गिरीश शिवणकर ,श्री वसंत कदम, यासह शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती

You cannot copy content of this page