श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात सहाय्यता कक्षाची स्थापना
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालय पूर्णा येथे इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश 2025 26 साठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या सहायता कक्षचे समन्वयक म्हणून श्री मिटकरी यु.पी .यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुका पूर्णाचे समन्वयक म्हणून ते काम पाहतील.त्यांचा संपर्क क्रमांक 94 21 38 4858 असा आहे. सन 2025- 26 साठी अकरावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश नोंदणी करायची आहे, त्यांना अडथळा येऊ नये यासाठी महाविद्यालयांतर्गत कमिटी निर्माण करण्यात आली आहे कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. के. राजकुमार सचिव श्री. मिटकरी यु.पी. तंत्रस्नेही श्री डावरे जी. एल. व श्री. पर्लेकर आर.एस प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी या सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के राजकुमार यांनी केले आहे.











