कै.भुजंगरावजी कदम यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

येथिल श्री गुरु बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी सचिव श्रद्धेय कै. भुजंगरावजी नारायणराव कदम यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, कोषाध्यक्ष उत्तमरावजी कदम, सहसचिव गोविंदरावजी कदम यांची उपस्थिती होती. प्रतिमेचे पूजन झाल्यावर श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.श्रद्धेय कै. भुजंगरावजी कदम यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेतीविषयक कार्याचा आढावा डॉ.व्यंकट कदम यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.शिवसांब कापसे, डॉ. गजानन कुरुंदकर,पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी,डॉ संजय दळवी, डॉ. जितेंद्र पुल्ले, डॉ, रवी बरडे, कार्यालयीन अधीक्षक बाळासाहेब कुलकर्णी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page