पूर्णा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत जाहीर करा-राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
तालुकाध्यक्ष शहराजीराव देसाईंच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन;शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
पुर्णा,ता.१६ (प्रतिनिधी) मागील आठवडाभर सुरू असलेल्या अतीवृष्टीच्या पावसामुळे पूर्णा तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.पक्षाचे तालुकाध्यक्ष शहाजीराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता.१५) रोजी येथिल तहसीलदार माधवराव बोथिकर यांना निवेदन दिले आहे.
पुर्णा तालुक्यात १५ आॅगस्ट पासून दोन ते तीन वेळा अतीवृष्टीचा पाऊस कोसळला.तर मागील पाच ते सहा दिवसांत पावसाने तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात हाहाकार उडवून दिला आहे.मागील १० वर्षात प्रथमच सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मुग,उडीद तुर, ऊस,हळद, केळी या प्रमुख पिकं पाण्याखाली गेली आहेत.तसैच जनावरांचेही बळी गेले असून, जमिनी देखील खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.तालुक्यातील नद्या व नाले ओसंडून वाहत असून धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागातही अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून ५० हजारांची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे.निवेदनावर तालुका अध्यक्ष शहजीराव देसाई,आबासाहेब पवार, श्रीधर पारवे, गोरख साखरे,शेख हुसेन, प्रल्हादराव मोहिते, व्यंकटराव तांबे, ज्ञानोबा गिरगे, विश्वनाथ धोत्रे, चंद्रकांत कराळे, मनोहर पवार, नरहरी कदम, माऊली डाखोरे,आदीं शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.











