तरुण हॉटेल मालकाने हॉटेलमध्येच लावला गळफास

Spread the love

नांदगाव येथील दुर्दैवी घटना ;पूर्णा पोलिसात घटनेची नोंद


पूर्णा (प्रतिनिधी) सोमवार दि.२० जानेवारी


एका २० वर्षीय तरुण हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलमध्येच रुमालाच्या साह्याने पत्र्याच्या खालील पाईपला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना पूर्णा पोलिसांच्या हद्दीतील नांदगाव येथे रविवार दि.१९ जानेवारी रोजी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
ओंकार प्रकाशराव भालेराव वय २० वर्ष रा. नांदगाव ता. जि. परभणी असे त्या मयत हॉटेल मालकाचे नाव आहे.परभणी -वसमत महामार्ग रस्त्यावर असलेल्या नांदगाव येथे मागील काही दिवसांपुर्वी ओंकार भालेराव यांनी एक नाष्टा,चहा पाण्याची हॉटेलचा व्यवसाय सुरू केला होता. रविवार दि.१९जानेवारी रोजी दिवसभर त्याने हॉटेलमध्ये व्यवसाय केला.रात्री हॉटेल बंद केल्यानंतर सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तो हॉटेलमध्ये एकलाच असताना त्याने त्याच्या पत्र्याच्या हॉटेल मध्ये पत्र्याखालील पाईपला गळ्यातील रुमालाच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली .सदरील घटना ही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर यांनी घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना कळवली.पोलीस निरीक्षक विलास गोबाडे ,जमादार श्याम काळे, पो.शी मंगेश जुकटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन गळफास लावलेला मृतदेह ताब्यात घेतला‌ घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आला असल्याचे समजते. हॉटेल मालक ओंकार भालेराव यांनी नेमकी कोणत्या व कशाच्या कारणामुळे गळफास लावला हे मात्र नक्की समजू शकले नाही. घटनेचा पुढील तपास पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार श्याम काळे हे करत आहे.

You cannot copy content of this page