एचएआरसीचा उपक्रम आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील महीलेस गिरणी,किराणा साहित्य भेट

Spread the love

परभणी/प्रतिनिधी
होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेतर्फे बैलपोळा निमित्ताने जिंतूर तालुक्यातील नागणगाव येथील निराधार विधवा सुनीता अमोल वाकळे यांना उदरनिर्वाहासाठी डाळ गिरणी तसेच जीवनावश्यक किराणा साहित्य शुक्रवारी(ता. २२)भेट देण्यात आले.

यावेळी एचएआरसी अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. दिनेश भुतडा, प्राचार्य कैलास मुटकुळे, समन्वयक प्रकाश डूबे, सरपंच कुबेर साळवे, उपसरपंच भास्कर चव्हाण, डॉ कृष्णा नागरे, देवराव चव्हाण, काशिनाथ कानडे आदी उपस्थित होते. सुनीता वाकळे या निराधार ताई आपल्या लेकराच्या उज्वल भविष्यासाठी शेतात रोजमजुरी करून संसारगाडा हाकत आहेत. पतीच्या मृत्यूनंतर माहेर-सासरचा आधार नसल्याने त्या बिकट परिस्थितीत जीवन जगत आहेत. शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. याची दखल घेत शिक्षक काशिनाथ कानडे व प्रकाश डुबे यांनी एचएआरसी संस्थेकडे ही बाब मांडली. त्यानंतर संस्थेने मदतीचा हात पुढे केला.

लोकसहभागातून मदत
या उपक्रमात मनोज कुचेरिया,अतुल जावळे, केदार धामणगावकर, संतोष बारबिंडे, डॉ. कृष्णा नागरे, नंदकुमार डोंगरे, अर्चना वट्टमवार आदींनी आर्थिक मदत देऊन आणि काशिनाथ कानडे, उद्धव घाटूळ, मुकुंद टाक यांनी एक महिन्याचे किराणा साहित्य देऊन वस्तुरूपी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे वाकळे कुटुंबास डाळ गिरणी, किराणा साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

                                     _______

You cannot copy content of this page