Breking;हाय व्होल्टेज वाहींनी खाली ऊसाचा ट्रॅक्टर पेटला;३ऊसतोड मजुर होरपळले

Spread the love

Purna Katneshwar village पूर्णेतील कात्नेश्वर शिवारातील घटना;; जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

पूर्णा(प्रतिनिधी)

तोडणीला आलेला ऊस(Sugar cane) तोडून ट्रॅक्टरमध्ये भरत असताना हाय व्होल्टेज वाहींनी(High voltage current line)खाली ऊसाचा ट्रॅक्टर येताच ट्रॅक्टर सह ट्राॅलीने(Tractor and Trolley)अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर शिवारात मंगळवारी ता.१८ रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले असून,घटनेत ट्रॅक्टरवर काम करत असलेले ३ ऊसतोड मजूर भाजल्याची माहिती आहे.जखमींवर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओंकार विश्वनाथ वंजारे (वय२८), विश्वनाथ वंजारे (वय ५१), कृष्णा दत्तराव वायकुळे( वय२३) तीघे रा.आडस ता.उमरखेड(Umarkhed) जि.यवतमाळ(Yavatmal) अशी त्या घटनेत जखमी झालेल्या ऊस तोड मजुरांची नांवे आहेत.सदरील मजुर जवळाबाजार येथील बाराशीव हनुमान साखर कारखान्याचा(Barashiv Hanuman Sugar)ऊसतोड टोळीत मजुर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. त्यांची टोळी पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील शेतकरी लक्ष्मण भिमराव कोंडे यांच्या कात्नेश्वर शिवारातील गट नं.३७१ मधील शेतात ऊस तोडणीसाठी दाखल झाली होती. दरम्यान मंगळवारी टोळीतील १० ते १५ मजुरांनी दिवसभरात शेतात ऊस तोडून जागोजागी मोळ्या बांधून ठेवलेल्या होत्या,ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्राॅलीमध्ये हा ऊस काही मजूर खालुन ट्रॅक्टरवर उभारलेल्या ५ ते ६ जणांकडे देत ट्रॅक्टरमध्ये भरत होते.दरम्यान अर्धेअधिक ऊस भरलेले ट्रॅक्टर क्र.एम.एच.२२/एक्स/११०९ हे शेतातून गेलेल्या महापारेषणच्या हाय व्होल्टेज वाहींनी ११०० केव्ही टाॅवर लाईन खाली आले असता त्यात ऊस भरताना अचानक उभ्या ट्रॅक्टर मध्ये स्फोट होऊन ट्रॅक्टर सह ट्राॅलीनेही पेट घेतला. दरम्यान शेतात ऊस तोड झाल्याने ऊसाची मोठ्या प्रमाणात पाचट पडलेली होती.पहाता पहाता ती पाचटही पेटली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या ऊसतोड मजुरांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवला.मात्र वाढत्या आगीमुळे ट्रॅक्टरवर असलेल्या ओंकार विश्वनाथ वंजारे, विश्वनाथ वंजारे बापलेकांसह, कृष्णा दत्तराव वायकुळे या तीघांना आगीतून बाहेर पडता आले नाही. परिसरात उपस्थित असलेल्या ऊस तोड मजूर व शेतमालक यांनी त्यांना शर्शिचे प्रयत्न करुन वाचवले.घटनेत दरम्यान गावातील पोलिस पाटील ज्ञानोबा काटकर, माजी सरपंच प्रकाश गलांडे, हनुमान शेंडगे,शिवाजी चापके, रामेश्वर शेंडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात(Parbhani Civil Hospital)उपचारासाठी दाखल केले आहे.यातील ओंकार वंजारे हा गंभीर रित्या भाजला असल्याची माहिती आहे.तर ट्रॅक्टर ट्राॅल्यां जळून मोठे नुकसान झाले आहे.पूर्णा तालुक्यात लोंबकळत असलेल्या विद्युत वाहीन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ऊस जळण्या सोबतच मोठ्या अपघाताच्या घटना घडत असल्याने महावितरण महापारेषण कंपनीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page