Hingoli;तीर्थक्षेत्र पुसेगावात उभारली भगवान बाहुबलींची ५१ फुटी मूर्ती

Spread the love

२ ते ८ फेब्रुवारी २०२६ मध्ये साधुसंत मान्यवरांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापना सोहळा

महासमाचार न्युज नेटवर्क:- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यांमध्ये पुसेगाव येथे देशातील दुसऱ्या क्रमांकाची श्री १००८ भगवान बाहुबलींची ५१ फुटाची मुर्ति (statue) उभारण्यात आली आहे. या मुर्तिच्या प्राण प्रतिष्ठापणेचा मुहूर्त ठरला असुन २ ते ८ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे भगवान बाहुबली तिर्थक्षेत्राचे काम जवळपास तीन वर्षापासून सुरू आहे. या तिर्थक्षेत्र ठिकाणी महाराष्ट्रातील (Maharashtra)एकमेव बाहुबली क्षेत्र असुन या ठिकाणी ५ १ फुटाची मुर्ति उभारण्यात आली आहे. या मुर्ति निर्माण कार्यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तिंनी मोठा हातभार लावलेला आहे. तसेच तिर्थक्षेत्राचा विकास करण्याकरीता शासन स्तरावरूनही मोठा निधी प्राप्त झाला आहे. पुसेगाव येथे श्री १००८ भगवान बाहुबली मुर्ति प्राणप्रतिष्ठापणा २ ते ८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर भगवंताचा महामस्तक अभिषेक सोहळा पार पडणार आहे. यावेळी भारतातील लाखो भाविक हा सोहळा पाहण्याकरीता येणार आहेत. तसेच मुनिश्री १०८ विशेष सागरजी गुरूदेव यांनी प्रतिमा निर्माणकार्य केले असुन त्यांचे गुरुवर्य या सोहळ्यासाठी येणार आहेत. याच बरोबर सोहळ्या करीता जवळपास ५० ते ६० साधूसंतासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्यातील पालकमंत्री आजीमाजी आमदार,खासदार, राजकीय, उद्योजक , उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

You cannot copy content of this page