होळी स्पेशल;पटणा व अजमेर करीता विशेष गाड्या धावणार
पूर्णा/प्रतिनिधी
दक्षिण मध्य रेल्वेने होळी निमित्त जालना ते पटना दरम्यान विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्याचे ठरविले आहे तसेच काचीगुडा ते मदार जंक्शन (अजमेर जवळ ) विशेष गाडीच्या चार फेऱ्या करण्याचे ठरविले आहे.
गाडी संख्या 07611 जालना ते पटना विशेष गाडी : ही गाडी जालना येथून दिनांक 6, 10 आणि 15 मार्चला रात्री 10 वाजता सुटेल आणि परतूर , सेलू , मानवत रोड , परभणी, पूर्णा , बसमत , हिंगोली, वाशीम, अकोला , शेगाव, मलकापूर, बुऱ्हानपूर, खांडवा, जुझार्पूर, इटारसी, पिपरिया , नरसिंघपूर, मदन महल, कटनी, मल्हार , सतना, मानिकपूर, प्रयागराज चावकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर , अरा, दानापूर मार्गे पटना येथे तिसर्या दिवशी सकाळी 9:45 वाजता पोहोचेल.
गाडी संख्या 07612 पटना ते जालना विशेष गाडी : ही गाडी पटना येथून दिनांक 8, 12 आणि 17 मार्चला दुपारी 15.45 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच जालना येथे तिसर्या दिवशी सकाळी 2:35 वाजता पोहोचेल.
गाडी संख्या 07701 काचीगुडा ते मदार विशेष गाडी : ही गाडी काचीगुडा येथून दिनांक 11 आणि 16 मार्चला रात्री 11:30 वाजता सुटेल आणि मल्काजगिरी , मेद्चाल, कामारेद्दी, निझामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा , बसमत , हिंगोली, वाशिम, अकोला , शेगाव, मलकापूर, बऱ्हाणपूर, खांडवा , इटारसी, राणी कमलापती, संत हिर्दाराम नगर, सेहोर, उज्जैन, रतलाम, जोरा, मंद्सोर, नीमच, चीत्तौरगढ, , चान्देरिया, भिल्वारा, बिजैनगर, नासिराबाद, अजमेर मार्गे मदार येथे तिसर्या दिवशी दुपारी 12:30 वाजता पोहोचेल.
गाडी संख्या 07702 मदार ते काचीगुडा विशेष गाडी : ही विशेष गाडी मदार येथून दिनांक 13 आणि 18 मार्च रोजी दुपारी 4.05 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे तिसर्या दिवशी पहाटे 4 वाजता पोहोचेल.