आय.जी पथकाची जुगार अड्डयावर छापेमारी

Spread the love
  • मोबाईलसह सुमारे २० हजार ९०० रुपयांचा ऐवज हस्तगत

पुर्णा,ता २८/ प्रतिनिधी

शहाजी उमाप, पोलीस उपमहानिरीक्षक, नांदेड पोलीस परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथके पाठविण्यात आली होती. या विशेष मोहिमेदरम्यान ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिमला गावातील राजकला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या परिसरात छापा घालण्यात आला.

छाप्यामध्ये एकूण १८ जण जुगार खेळताना आढळून आले. संबंधितांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा एकूण २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, संजू जिंकलवाड, पोलीस अमलदार गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली.दरम्यान, परभणी जिल्हा व आसपासच्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबतची माहिती नागरिकांनी पोलीस उपमहानिरीक्षक पथकास किंवा कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page