तर तहसिलदारांची खुर्ची सुतळी बाॅम्बने उडवू-शिवहार सोनटक्के

Spread the love

पूर्णेत बच्चू कडूंसाठी प्रहार कार्यकर्त्यांचे मुंडण आंदोलन

पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा.राज्यमंत्री बच्चु कडुंनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यात मागील ५ ते ६ दिवसांपासून अन्नत्याग करत आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. शासनाने बच्चुकडुंच्या सर्व मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात अन्यथा तहसीलदारांच्या खुर्ची खाली सुतळी बॉम्ब लाऊन खुर्ची उडवून दिली जाईल.असा गर्भित ईशारा पुर्णेतील प्रहारचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी प्रशासनाला दिला आहे.

परभणी जिल्ह्यातील पुर्णेत शुक्रवारी ता.१३ रोजी प्रहारचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुंडण आंदोलन केले.यावेळी त्यांनी‌ माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.सदरील आंदोलनात असंख्य शेतकरी,दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी,अनेकांनी तहसीलच्या पायरीवर बसून केसं कापुन मुंडण केले यावेळी शासनास निवेदन देण्यात आले. शासनाने बच्चु कडुंच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी. बच्चूभाऊ कडूंच्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर सरकारची गय केली जाणार नाही. अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी स्थानिक महसूल विभागाच्या माध्यमातून शासनास निवेदन देण्यात आले.निवेदनावर प्रहारचे तालूका प्रमुख शिवहार सोनटक्के, विष्णू बोकारे, संजय वाघमारे, टोपक्या भोसले, श्रिहरी ईंगोले, तूकाराम पारवे, जगन्नाथ नवघरे, रमेश जाधव, भागवत पिसाळ, शहाजी दिवटे, विठ्ठल पिसाळ, छत्रपती वाघ, केशव पारवे, शिवाजी वंजे, श्याम सोळंके, नामदेव बनसोडे, जानकीराम लोंढे, विठ्ठल बुचाले,शरद कदम,राम सुके,मंचक वैद्य‌ सह आदीं कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page