आय.जी. शहाजी उमापांकडून ताडकळस पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक शाहजी उमाप यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी बुधवार १२ मार्च रोजी पार पडली.

शहाजी उमाप हे बुधवारी ताडकळस दौऱ्यावर होते याप्रसंगी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, परभणी ग्रामीण उपविभागीय अधिकारी चंद्रशेन देशमुख,सपोनि गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, पोलिस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे यांच्यासह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, पत्रकार आदींची उपस्थिती होती.

यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप यांनी पोलिस ठाण्यातील रेकार्ड रुम, मुद्देमाल जप्ती, इमारत पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच येथील अंमलदार शुभांगी बडवणे, सपोउपनि बर्गे,घुगे,दुधारे आदी पोलिस कर्मचार्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सपोनि.गजानन मोरे यांनी पोलिस ठाण्याच्या कार्याचा आढावा सादर केला.

तसेच पोलिस उपमहानिरीक्षक उमाप यांच्या हस्ते पाणीपोईचे उद्घाटन करुन पोलिस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.

यावेळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात सिसीटीव्ही कँमेरे बसविणाऱ्या गावातील नागरिकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आय. जी.उमाप यांनी उपस्थितांना संबोधित करताना गावातील प्रत्येक नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. यासाठी पोलिसांनी देखील प्रत्येक नागरिकाला विश्वासात घेऊन गावातील एकता व शांतता निर्माण करावी असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप म्हणाले .

. पोलिस ठाण्याचे कर्मचारी जमादार, अंमलदार, फौजदार,सपोनि तसेच पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांनी.कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page