स्वातंत्र्य दिन;श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात’प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन.
पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)
येथील श्री गुरूबुद्धिस्वामी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ‘प्रशासननामा’ भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले श्री गुरुबुद्धीस्वामी महाविद्यालयात लोकप्रशासन विभागाच्यावतीने आणि श्रद्धेय सिताराम आप्पा एकलारे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीर पुरुष’ हा विशेषांक ‘प्रशासननामा’ या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रमोदअण्णा एकलारे,अमृतराज कदम, प्रा.गोविंदराव कदम, प्राचार्य डॉ.के .राजकुमार ,उपप्राचार्य डॉ. शिवसांब कापसे आणि डॉ.गजानन कुरुंदकर,रेखा पाटील,प्रा.एस.के.जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.











