स्वातंत्र्य दिन;रिलाॅयबल अँग्रो फुड कंपनीत मारोतराव बखाल यांच्या हस्ते ध्वजारोहण
पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्य दिन येथिल रिलाॅयबल अँग्रो फुड कंपनीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कानडखेड सरपंच मारोतराव बखाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

पूर्णा कानडखेड शिवारातील रिलाॅयबल अँग्रो फुड कंपनीत १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रसंगी सरपंच मारोतराव बखाल यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.यावेळी संचालक शाहीद हुसैन, व्यवस्थापक अमरनाथ पटेल, डॉ.मो.अय्युब, अब्दुल समद आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राष्ट्रगीतानंतर मान्यवरांची उपस्थिती कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत लाडु वाटप केले.












