हभप.हेंडगे महाराज खुन प्रकरण;आज जिल्हाधिकारी कचेरीवर ‘जनाक्रोशमोर्चा’

Spread the love

▶उखळद ग्रामस्थांनी घेतला बैठकीत निर्णय

परभणी ता.१४(प्रतिनिधी)

‘बाळकृष्ण हायटेक रेसिडेन्सी स्कूल’चे संस्थापक ‘प्रभाकर उर्फ बाळू चव्हाण’ व त्यांच्या पत्नीने केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेत परभणी तालुक्यातील उखळद येथील हभप जगन्नाथ महाराज हेंडगे यांचामृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार (ता.१५) जुलै रोजी सकाळी (१०) वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

भागवताचार्य हभप.जगन्नाथ महाराज हेंडगे यांच्या खुन प्रकरणानंतर या घटनेने संबंध जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.हेंडगे महाराजांना न्याय मिळवून देण्यासाठी उखळद येथिल ग्रामस्थ एकवटले आहेत.सोमवारी (ता.१३) रोजी सायं उखळद व परीसरातील ग्रामस्थांनी एक बैठक आयोजित केली होती.बैठकीत हायटेक स्कूलच्या संस्था चालकांच्या अमानवी कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.संथाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण या दोघांना तात्काळ अटक करावी व हेंडगे परिवारास न्याय मिळवून द्यावा, संस्थेची मान्यता रद्द करावी.या मागणीसाठी हा मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.हा मोर्चा मंगळवारी (ता.१५) जुलै रोजी परभणी येथील वसमत रोडवरील श्रीकृष्ण गार्डन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उखळद ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page