हभप.हेंडगे महाराज खुन प्रकरणाचे पडसाद विधासभेत-आ.डॉ.राहुल पाटलांचे निवेदन
पूर्णा ता.१५(प्रतिनीधी)
परभणी जिल्ह्यातील उखळद गावातील कीर्तनकार भागवताचार्य हभप.हेंडगे महाराज खुन प्रकरणाचे पडसाद विधासभेत आज मंगळवारी ता.१५ रोजी विधानसभेत उमटले आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल पाटल यांनी प्रश्न उत्तराच्या तासांमध्ये सभागृहात निवेदन लावून शासनाचे लक्ष वेधून घेतले.यानंतर विधानसभा अध्यक्षांनी उद्यापर्यंत याचे निवेदन सभागृहात सादर करण्याचे सरकारला आदेशीत केले आहे.

पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी स्कूल येथे आपल्या पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी गेलेल्या परभणी तालुक्यातील उकळत येथील रहिवाशी तथा कीर्तनकार ह भ प जगन्नाथ महाराज हेंडगें यांना संबंधित शाळेचे संस्था अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाळू चव्हाण व पत्नी संस्था सचिव प्राचार्य रत्नमाला चव्हाण या दोघांनी हेंडगे महाराजांकडे सबंध वर्षाची फि ची मागणी केली. फीस देण्यास नकार दिल्याने संस्थाचालक दम्पत्यांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम महाराज मारहाण सुरू केली. यामध्ये त्यांचा दारुण मृत्यू झाला ही घटना ता.१० जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. यानंतर हद्दीतील पूर्णा पोलीस स्थानकात हेंडगे महाराजांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सबंधित संस्था चालक का विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मयत हेंडगे महाराज कुटुंबीयांना जिल्हाभरातून सहानुभूती मिळत आहे. मागील तीन ते चार दिवसात संतप्त झालेल्या वारकरी संप्रदायाने तसेच उखळद ग्रामस्थांनी मंगळवारी (ता.१५) रोजी परभणी जिल्हा कचेरीवर जनआक्रोश मोर्चाही काढला. त्यांच्या कुटुंबीयाचे सांत्वनासाठी कीर्तनकार हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर,खा.संजय जाधव, आ.राहुल पाटील, गंगाप्रसाद आणेराव, आनंद भरोसे,शिवाजी भरोसे, विजय वरपूडकर,सुरेश भुमरे आदींनी भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला.

महाराजांना न्याय मिळे पर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान या प्रकारामुळे संबंधित संस्था चालका विरोधात संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थाचालक आपल्या पत्नीसह गाशा गुंडाळून पसार झाला आहे.परभणी पोलीसांनी याप्रकरणी तीन विविध पथके स्थापन केले आहेत. तसेच त्या संस्थाचालक दाम्पत्याची ‘लुकआउट’ नोटीसही जारी केली आहे.आज मंगळवारी संबंधित प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभा अध्यक्षाकडे एक निवेदन सादर केले. त्यामध्ये त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष्यांनी उद्यापर्यंत याचे निवेदन सभागृहात सादर करण्याचे सरकारला आदेशीत केले आहे. उद्या सभागृहामध्ये याप्रकरणी नेमके काय घडणार संबंधित संस्था चालकाची अटक होणार..? तसेच त्याच्या संपत्तीची, शैक्षणिक संस्थेची चौकशी होणार..? याकडे लक्ष लागले आहे.












