ह.भ.प जगन्नाथ महाराज हेंडगे खून प्रकरणात परभणी पोलिसांची लूक आऊट नोटीस..!
पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)
तालुक्यातील झिरो फाटा येथील बाळकृष्ण हायटेक निवासी शाळेत चार दिवसापूर्वी घडलेल्या ह.भ.प जगन्नाथ महाराज हेंडगे खून प्रकरणात पोलिसांना हवे असलेल्या आरोपींचे परभणी पोलीस दलाने लूक आउट नोटीस जारी केली आहे.
पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथिल झिरोफाटा येथे बाळकृष्ण हायटेक निवासी शाळा आहे.परभणी तालुक्यातील कीर्तनकार पालक ह भ प जगन्नाथ महाराज शेंडगे हे ता.१० जुलै रोजी तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी आपल्या चुलत्या सोबत गेले होते दरम्यान त्यांना टिसी देण्यासाठी संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळू चव्हाण तसेच त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी शैक्षणिक शुल्काची मागणी करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत ह.भ.प हेंडगे महाराजांचा मृत्यू झाला. घटने प्रकरणी पूर्णा पोलीस स्थानकात गुरन २९८/२०२५ कलम १०३(१) ,११५(२),३५२,३(५) भा.न्या.संहीता कायद्यानुसार कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर संबंधित संस्था चालकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटना घडल्यानंतर मुजोर संस्था चालक दाम्पत्य घटनास्थळांवरून पसार झाले आहे. मागील चार दिवसांपासून संबंधित प्रकरणा विरोधात जनमानसांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. उखळद येथे सकल गावकऱ्यांनी एक बैठक बोलावून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
गुन्हा घडल्यानंतर फरार असलेले हायटेक रेसिडेन्सी स्कूलचे संस्था चालक चव्हाण दाम्पत्याच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलिस दलातील अनुभवी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकं तैनात केली आहेत. यानंतर सोमवारी १४ रोजी परभणी पोलीस नियंत्रण कक्षाच्या वतीने आरोपींची लुक आउट नोटीस जाहीर केली आहे. सदरील प्रकरणात हवे असलेले आरोपी हे फरार असल्याने ते कोणला आढळून आल्यास माहिती मिळाल्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोलीस निरीक्षक पूर्णा विलास गोवाडे, आणि गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सपोनी गजानन मोरे ताडकळस या अधिकाऱ्यांशी तसेच परभणी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन या नोटीसमध्ये जाहीर केले आहे.