अभाविप जालना तर्फे बारव स्वच्छता,संवर्धन व वृक्षारोपण संपन्न

Spread the love

अभाविप जालना तर्फे बारव स्वच्छता,संवर्धन व वृक्षारोपण संपन्न

दि.०५ जून :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जालना शाखेतर्फे आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जालना शहरातील भाग्यनगर प्रभागातील पुरातन अशी पलंग बारवची स्वच्छता करण्यात आली. ही बारव अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील असुन सुमारे 300 वर्षे जुनी आहे. इंदिरा नगर ,भाग्य नगर ,गोकुळ नगरी, राणा नगर,वृंदावन कॉलोनी इत्यादी भागातील नागरिकांची पाण्याची तहान सातत्याने भागवत आहे. अशा या पुरातन पाण्याच्या स्रोताचे दुर्लक्षाअभावी नुकसान होत होते, त्यामुळे या बारवाची स्वच्छता करणे अभाविपने हेरले आणि पर्यावरण दिन हा वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यासाठी या बारवाची स्वच्छता मोहीम राबवली.या कामासाठी प्रभागाचे नगरसेवक तथा न.प.जालनाचे गटनेता श्री.अशोकअण्णा पांगारकर यांनी मोलाचे सहकार्य केले.याठिकानाहून सुमारे दोन ट्रॅक्टर कचऱ्याचे संकलन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यानी केले. तदनंतर मुक्तेश्वर महादेव मंदीर परिसरात देशी वृक्षाची लागवड करुन पर्यावरण दिनाचे महत्व अदोरेखीत करण्यात आले. या सर्व उपक्रमासाठी अभाविपचे पूर्व कार्यकर्ते श्री.विवेक कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन केले.यासोबतच अभाविपचे श्रेया चंदन,साक्षी मुळे,दर्शना पाटील,रुपाली जाधव,दिव्यप्रिया देशमुख,श्रुती देहेडकर,ऋतुजा पाठक,वेदांत खैरे,अनिकेत शेळके,समाधान कुबेर,ऋषिकेश राऊत,बालाजी टेकाळे,अनिकेत भांदरगे, विकास कदम,चंद्रकांत हांडे,आशिष चव्हाण,आयुष निकम यांनी श्रमदान केले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमानावर उपस्थित होते.
#abvp #abvpjalna

You cannot copy content of this page