पहेलगाम हल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा निषेध, मुस्लिम समाजा कडून पूर्णा बंदचे आवाहन

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

देशातील कश्मीर येथील पहेलगाम या गावात पर्यटकांवर भ्याड हल्या झाल्याच्या निषेधार्थ पूर्णा शहरात गुरुवारी२४ रोजी सायं येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ममतांना श्रध्दांजली अर्पण करून भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला तर याच घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजबांधवांनी उद्या ता.२५ शुकवार रोजी , शहरातील व्यापा-यांना आपली, दुकाने, संकुल बंद ठेवुन बंद मध्ये सहभागी होऊन निषेध व्यक्त करावा असे आवाहन केले आहे.

     जम्मू काश्मीर मधील पहेलगाम येथे देशातील निष्पाप पर्यटकांवर अतेरेक्यांनी अमानुष गोळीबार करून त्यांना जिवे मारले.या घटनेच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली आहे.ठिकठिकाणी बंद निदर्शने निषेध व्यक्त केला जात आहे.पूर्णा शहरात गुरुवारी येथील हिंदू समाज बांधवांनी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.तर येथिल मुस्लिम बांधवांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुर्णा बंदचे आवाहन केले असून, पोलीस प्रशासनास याबाबत निवेदन दिले आहे.निवेदनात

सदरील अंतकवाद्या विरुध्द सरकारने कठोरात कठोर पाऊल उचलावी तसेच पाकिस्थानातील अतिरेकी छावण्या उद्दस्थ कराव्यात. भारतीय नागरिकांच्या भावनांचा आदर करावा असे म्हटले आहे., शुक्रवारी दुपारी २ वाजता जामामजिद समोर मा. तहसिलदार, पूर्णा यांच्या मार्फत मा.ना. राष्ट्रपती महोदया यांना हे निवेदन  पाठविण्यात येणार आहे.तरी या बंदला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांना ‘पूर्णा बंदची’ नोंद घेणे बाबत मुस्लिम समाज बांधवांसाठी निवेदन दिले आहे.

You cannot copy content of this page