वंचितच्या मोर्चात चक्क गाढवालाच निवेदन..
पूर्णेत जनआक्रोश मोर्चातील प्रकार;पालीकेत जबाबदार अधिकाऱ्यांची नसल्याने गाढवाला निवेदन देण्याचा घेतला निर्णय
पूर्णा(प्रतिनिधी)
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा पालीकेवर वाढीव मालमत्ता कर आदीं मागण्यांसाठी बुधवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.याप्रसंगी निवेदन स्वीकारण्यासाठी पालीकेत मुख्याधिकारी, कार्यालयीन अधीक्षक हजर नसल्याने पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी चक्क प्रभारी मुख्याधिकारी म्हणून गाढवालाच आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला आहे.
पूर्णा पालीकेवर शहरातील वाढीव मालमत्ता कर, महात्मा बसवेश्वर, शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा बसबणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात सुशोभीकरण करणे,पाणीपुरवठा, स्वच्छता, शहरातील नाली,रस्ते आदीं १७ प्रमुख मागण्यांसाठी वंचितचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे,युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी ता.४ जुन रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.मोर्चेक-यांनी डॉ आंबेडकर नगर येथून मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत करण्यात आले.यावेळी मोर्चात वंचितचे राज्य कार्यकारिणीचे नेते अँड.अविनाश भोसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मंचावर दिलीपराव हनमंते,राजु नारायणकर, यांच्या सह शामराव जोगदंड,शामसुंदर काळे.रवी वाघमारे,चेतानंद वाघमारे, सौ.अर्चना पंडित,नागेश एंगडे,सौ मंजुषा पाटील आदींची उपस्थिती होती.यावेळी शहरातील समस्येसह वाढीव मालमत्ता कर वाढ पालीकेने रद्द करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
मोर्चाच्या समारोप नंतर कार्यकर्त्यांनी पालीकेला निवेदन देण्यासाठी प्रयत्न केला मात्र पालीकेचे मुख्याधिकारी,तसेच कार्यालयीन अधीक्षक हजर नसल्याने संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी अखेर एका गाढवाला मोर्चा स्थळी आणुन त्यास पालीकेचे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून निवेदन देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांसह वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.प्रसंगी सुनिल मगरे यांनी मोर्चाची प्रस्तावना केली.तर तुषार गायकवाड यांनी आभार मानले.यावेळी मा.नगराध्यक्ष दिलीप गायकवाड युवानेते राजू नारायणकर यांनी पालीकेच्या कारभारावर सडकून टीका केली.
——————————————-
वंचित कडून तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा
पालीकेत अनागोंदी कारभार सुरू आहे.भष्ट्राचाराने परिसीमा गाठली आहे.मुख्याधीका-यांचा पालीका कर्मचाऱ्यांवर अंकुश राहीला नाही.वाढत्या महागाईत जनतेवर पालीका प्रशासनाने वाढीव मालमत्ता कराचा बोजा टाकला आहे.पालीकेतीलसत्ताधाऱ्यांनी पालीकेची पिळवणूक केली आहे.वंचित या सर्व प्रकाराचा बंदोबस्त करण्यासाठी सक्षम आहे.मागण्यामान्य न झाल्यास कोणत्याही गुन्ह्याची पर्वा न करता यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.
-अँड अविनाश भोसीकर












