परभणी ता.२१(प्रतिनिधी)
जनसुरक्षा विधेयकास राज्य सरकारने मंजूरी देऊ नये व राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्री मंडळातून हाकालपट्टी करावी,या मागणीसाठी परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संतप्त पदाधिकार्यांनी सोमवारी (ता.२१)जोरदार निदर्शने केली.
महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, रवि सोनकांबळे, सरचिटणीस बाळासाहेब फुलारी, प्रा. रामभाऊ घाटगे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, माजी सभापती सुनील देशमुख, माजी सभापती गुलमीर खान, शेख मतीन, नागसेन भेरजे, गुलाम मोहम्मद मिठ्ठू, श्रीधर देशमुख, सुहास पंडीत, गणेश वाघमारे, जानू बी, अब्दुल सईद यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनसुरक्षा विधेयक बिल हे लोकशाही तत्वाच्या विरोधात आहे, असे स्पष्ट केले. वादग्रस्त व वाचाळवीर कृषिमंत्र्यांची हाकालपट्टी करावी, अशी मागणी केली. या पदाधिकार्यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले.