जिष्णू देव वर्मा राज्याचे नवे राज्यपाल
१५ सप्टेंबरला घेणार अधिकृत पदभार
मुंबई/प्रतिनिधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती केली आहे.ते १५ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे आपल्या पदाची सुत्रे हाती घेणार असल्याचे समजते.
जिष्णू वर्मा हे मावळते राज्यपाल आचार्य देवव्रत यांची जागा घेतील. त्यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतली होती. जिष्णू वर्मा यांच्या रूपाने आता महाराष्ट्राला पूर्णवेळ राज्यपाल मिळाले आहेत. जिष्णू देव वर्मा हे अनुभवी राजकारणी असून यापूर्वी त्यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच तेलंगाना राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. लवकरच लोकभवन मुंबई येथे त्यांचा शपथविधी सोहळा होईल.
_________










