छ.संभाजी महाराज व शिवा काशिद यांची जयंती साजरी
पूर्णा, ता. १७(प्रतिनिधी)
छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्याचे शुर मावळे वीर शिवा काशिद यांच्या जयंतीनिमित्त जीवाची सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
पूर्णा येथील वीर जिवाजी महाले चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे वीर शिवा काशिद व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शनिवारी (ता. १७) रोजी जीवा सेना परभणी जिल्हाध्यक्ष राम सुर्यवंशी यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माणिकराव कदम, जीवा सेना परभणी जिल्हाध्यक्ष राम सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष सोमनाथ भोसले, रमण ठाकुर, सखाराम कदम आदींची उपस्थित होते.