जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळांडुची चमकदार कामगिरी
मानवत येथे पार पडली पुणे(बालेवाडी)येथे होणा-या स्पर्धांसाठीची निवड चाचणी
पुर्णा ता.२२(प्रतिनिधी)जिल्ह्यातील मानवत येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय ज्युनिअर ॲथलेटिक्स क्रिडा स्पर्धेतील विविध प्रकारात परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी करत बालेवाडी येथे होणा-या स्पर्धांसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

पुणे(बालेवाडी) येथे होणा-या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ गट (ज्युनियर गट) अॅथैलटीक्स स्पर्धेंसाठी जिल्ह्यातील मानवत येथे १४,१६,१८,२० वयोगटातील खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली.मार्गदर्शक तथा क्रीडा प्रशिक्षक सज्जन जयस्वाल व प्रकाश रौंदळे यांच्या नेतृत्वाखाली १४ वयोगटा रुद्र जामगे, ट्रॅयाथलाॅन सी गट द्वितीय वयोगट १६ उंचउडी, योगेश बोबडे (प्रथम) व मोहम्मद अफरोज मोहम्मद इलियास (द्वितीय),६००मीटर धावणे दशरथ पवार (द्वितीय),वयोगट २० शेख फैजान शेख समंदर थाळीफेक( द्वितीय) मुलींच्या गटांमध्ये( प्रथम)वयोगट१४ मुली वैशाली सूर्यवंशी अ गट (प्रथम) व नंदिनी देवणे (द्वितीय) ट्रॅयाथलाॅन सी गट गौरी भोसले (द्वितीय) वयोगट १७भालाफेक भाग्यलक्ष्मी भोसले (प्रथम) जान्हवी भाले (द्वितीय) लांब उडी स्नेहल शिंदे (द्वितीय) मिडल रिले भाग्यलक्ष्मी भोसले, जान्हवी भाले,स्नेहल शिंदे,किरण सोळंके,प्रणिता तांबे(प्रथम), वयोगट(१८) ३ किमी चालणे श्रावणी शिंदे(प्रथम) हर्षदा पारटकर (द्वितीय),थाळीफेक (प्रथम)आरती राऊत गोळाफेक(प्रथम) लांब उडी (प्रथम)२०० मीटर धावणे पुनम भोसले(द्वितीय), १ हजार मीटर धावणे मंजुषा राजमाने (प्रथम) व थाळी फेक(द्वितीय) वयोगट २० (प्रथम),आरंती भोसले थाळीफेक (प्रथम) व गोळाफेक (द्वितीय) या जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनच्या खेळाडूंनी विजय मिळवला आहे.या सर्व खेळाडुंनी आपली निवड सार्थ ठरवली आहे.
विद्या प्रसारिणी शाळेच्या वतीने संस्थाध्यक्ष डॉ.विनय वाघमारे, मुख्याध्यापक देविदास उमाटे, परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशन अध्यक्ष संतोष एकलारे, सतिश टाकळकर,प्रकाश बनाटे,दत्ता सुर्यवंशी, शिवलिंग तुरेराव तसेच रामेश्वर भाले,उध्दव बोबडे, संतोष बहोत यांनी खेळाडूंच्या या घवघवीत यशा बद्दल खेळाडू व क्रीडा प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.












