Nanded New Railway: 20 जुलैपासून काचीगुडा-नांदेड-भगत की कोठी नवी एक्सप्रेस रेल्वे धावणार
नांदेड (Nanded New Railway) : काचिगुडा-नांदेड- भगत की कोठी (जोधपूर) नवीन ट्रेन ( ट्रेन नं १७६०५ / १७६०६ ) २० जूलै २०२५ पासून धावणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे हिंगोली जिल्हा रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने आभार मानन्यात आले आहे.

ही (Hingoli New Railway) एक्सप्रेस काचिगुडा- निझामाबाद – मुदखेड – नांदेड – पुर्णा – हिंगोली – अकोला – खांडवा मार्गे जोधपूर पर्यंत धावणार आहे. विशेषतः हैदराबाद, नांदेड, हिंगोली, अकोला परिसरातील राजस्थानी मूळ असलेल्या लोकांना तसेच हजूर साहिब दर्शनार्थी सिख यात्रींना लाभदायक ठरेल प्रादेशिक दळणवळण सुलभ होऊन पर्यटनास चालना मिळेल तसेच नांदेड , परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांना राजस्थानात जायला नियमित गाडी उपलब्ध होणार आहे. सदरील सेवा दिनांक २० जुलै २०२५ पासून काचिगुडा येथून तर दिनांक २२ जुलै २०२५ पासून भगत की कोठी (जोधपूर) येथून नियमितपणे सुरू होणार आहे.