काजीपेठ-दादर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस महीनाभर रद्द
पूर्णा ता.६ जुन(प्रतिनीधी)
दमरेच्या सिकंदराबाद विभागात संभाव्य रोलींग ब्लॉकच्या कामामुळे काजीपेठ येथून दादरकडे धावणारी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस महीनाभर रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे.
सिकंदराबाद विभागातून काजिपेठ येथून मुंबई महानगरातील दादर स्थानकांपर्यंत दर शनिवारी चालवण्यात येणारी काजिपेठ एक्सप्रेस(०७१९७) काजिपेठ येथून ता.७,१४,२१,२८ जुन तसेच दादर येथून काजीपेठ दरम्यान धावणारी विशेष एक्सप्रेस (०७१९८) ता.८,१५,२२,२९ जुन रोजी सिकंदराबाद विभागात होत असलेल्या संभाव्य रोलींग ब्लॉक मूळे पुढील महीनाभर रद्द करण्यात आली आहे.या गाडीने प्रवास करणाऱ्यां प्रवाशांना होणा-या अडचणी मुळे प्रवाशांनी मुंबईकडे जाणाऱ्या ईतर रेल्वे गाड्यांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.