कानडखेड-१ येथे अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथेचे आयोजन.

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील कानारखेड-१ येथे १२ ते १९ एप्रिल दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद भगवत कथा यज्ञाची भव्य आयोजन करण्यात आलेले आहे.

कानडखेडा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिर संस्थान कानडखेड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा आयोजित करण्यात आली असून ,अखंड हरिनाम सप्ताहात भागवत कथेचे निरूपण भागवताचार्य ह.भ.प मुरलीधर महाराज काळबांडे ममदापूरकर हे करणार आहेत. या सप्ताह दरम्यान दैनंदिन कार्यक्रमांमध्ये पहाटे ४ते ६ काकडा सकाळी ६ते १० ज्ञानेश्वरी पारायण १० ते १२ गाथा भजन दुपारी१ ते५ भागवत कथा ५ ते ७ हरिपाठ दुपारची रात्री ९ ते११ सांप्रदायिक कीर्तन असे कार्यक्रम पार पडणार आहेत. सात दिवसांमध्ये कीर्तनाची पर्वणी असणार आहे. त्यामध्ये शनिवार दिनांक १२ रोजी ह.भ. प माऊली महाराज निळा, रविवारी १३ एप्रिल रोजी ह.भ.प हरी महाराज बुचाले आवई, सोमवारी १४ रोजी ह.भ.प दीपक गुरु जोशी पांगरेकर, मंगळवार १५ रोजी ह. भ. प शिवाजी महाराज नांदेड, बुधवार दि.१६ ह.भ.प भगवान महाराज लहानकर,गुरुवार दि.१७ रोजी ह.भ.प कल्याण महाराज वसमतकर,शुक्रवार दि.१८ ह.भ.प त्र्यंबक महाराज गिरी यांचे पूजेचे कीर्तन दुपारी २ ते ४ रात्री ह.भ.प ज्ञानेश्वरी दीदी वाशिम, शनिवार दि.१९ रोजी ह.भ.प आरती ताई कावरे बोरीकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ नंतर सामूहिक महाप्रसाद होईल. तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त कानडखेड गावकरी मंडळी केले आहे.

You cannot copy content of this page