बेशुद्धीचे ईन्जेक्शन देऊ जनावरे पळवली;३ शेतकऱ्यांच्या पशुधनाची चोरी

Spread the love

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील घटना;अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

तालुक्यात जनावरांना बेशुद्धीचे ईन्जेक्शन देऊन त्यांना पळवून नेणारी चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी ता.११ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कात्नेश्वर येथून तीन शेतकऱ्यांच्या जनावरांना बेशुद्धीचे ईन्जेक्शन देऊन त्यांचे म्हैस, गाय,कालवड असे ९० हजार रुपयांचे पशुधन चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्णा पोलिसांत कात्नेश्वर येथिल किशन गणेशराव चापके (वय ४४) वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. ११ रोजी रोजी मध्यरात्री अडीचच्या सु.जाग आल्यावर ते झोपेतुन उटुन घराच्या बाहेर जाऊन घराच्या बाजुला असलेल्या पाटबंधारे विभागामध्ये कम्पाउंड वाल येथे माझी म्हैशीला पाणी, चारा टाकण्या करीता गेलो असता तेथे माझी म्हैस दोरीने बांधलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही त्याचे बाजुला बांधलेली तीन गायी, एक गोरा, दोन बैल अशी जनावरे बेशुध्द आवस्थेतत दिसत होते. तेंव्हा त्यांनी शेजा-याना आवाज देवुन उठविले. तेथिल आजु-बाजूच्या परीसरात पहाणी केली असता माझी म्हैस दिसुन आली नाही. नंतर डॉ. भुजबळ यांना बोलावुन तेथे म्हैशीच्या बाजुला दोरीने बांधलेली जनावरे का बेशुध्द पडले असे पहाण्याकरीता बोलावले असता डाॅ. भुजबळ यांनी जनावरांना तपासुण पाहील्या नंतर , त्यांनी सांगितले नुसार जनावरांना कोणीतरी बेशुध्दीचे इंजेक्शन दिले आहे त्यामुळे जनावरे बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत.फिर्यादीचे म्हैशीला पण कोणीतरी बेशुध्द करून घेवुन गेले असावे असा अंदाज आहे.तसेच दोघेतिघं मिळुन आजुबाजूच्या परीसरात पहाणी करीत असतांना त्यांना लिंबाजी दत्तराव चापके रा. कात्नेश्वर हे पण भेटल्यानंतर त्यानीपण आम्हाला सांगितले की, माझे घराच्या दराबाहेर बांधुन टेवलेली लाल रंगाची गाय दोर कापुन अज्ञात चोराने घेवुन गेला आहे. तसेच नांदगांव येथील संजय मदनराव भालेराव यांच्या कात्नेश्वर रोडलगत असलेल्या आखाड्यावरून त्यांची दोरीने बांधलेले एक बगार दोरी कापुन कोणीतरी अज्ञाच चोरट्याने चोरून नेली असल्याचे उघडकीस आले असून कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदरील पशुधन चोरून नेले आहे अशी पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.याववरुन पोलीसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

You cannot copy content of this page