३१०५ कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न;कुंभकर्ण टाकळीत सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे नियोजन
परभणी/प्रतिनिधी
तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर रविवारी (दि.९) सकाळी ८ ते १० या वेळेत संत-महंत, यजमानांसह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधींसह मंत्रोच्चारात ३१०५ कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न झाला.
सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या प्रेरणेने आयोजित या महागायत्री महायज्ञ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.८) धार्मिक विधींसह देवतांंच्या मुतींची स्थापना करण्यात आली. यावेळी सुशील देशमुख, समशेर वरपुडकर, भगिरथ बद्दर, व्यंकटेश कुरुंदकर यांच्यासह अन्य मुख्य यजमान होते.
रविवारी सकाळी ८ वाजता ३१०५ कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्यास प्रारंभ झाला. या सोहळ्याची संपूर्णाहुती श्री गायत्री यज्ञ विधींचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न प्र.य. नित्रुडकर, श्री. सुरेश महाराज उटीकर, हभप माधवबुवा आजेगांवकर यांनी केले. गायत्री मंत्राच्या स्वाहाकाराने महायज्ञास प्रारंभ झाला. धार्मिक विधींसह मंत्रोच्चारात सुमारे दोन तास चाललेल्या या सोहळ्यात सपत्नीक यजमानांनी यज्ञ आहुती दिली.
या महागायत्री महायज्ञ सोहळ्यानंतर सकाळी १०वा. संत पुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी श्री १००७ वेदांताचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरी, श्री महामंडलेश्वर १००८स्वामी हरिश्चंद्र महाराज, श्री १००८आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, श्री. स्वामी सच्चिदानंद सरस्वती महाराज, श्री नरेंद्रदास त्यागी महाराज, श्री मकरंद महाराज, हभप माधवराव आजेगांवकर, वेदशास्त्रसंपन्न भागवताचार्य श्री बाळुगुरु असोलेकर, वेदांतभास्कर प्रमोदशास्त्री कुलकर्णी, वेदशास्त्रसंपन्न उमेश महाराज टाकळीकर, श्री १००८ महेशानंद पुरी महाराज, हभप श्री नामदेव महाराज चारठाणकर, महंत श्री दत्ता महाराज, श्री शंकर बापू, श्री शिवाजी महाराज राऊत, हभप अच्युत महाराज दस्तापुरकर, श्री रमेश महाराज शर्मा, महंत महादभारती गुरुज्ञान भारती आनंदी महाराज, हभप पंडीत महाराज डाके, हभप राम महाराज काजळे, हभप पुरुषोत्तम महाराज, सुरेश महाराज उटीकर, स्वामी अच्युतानंद महाराज आदी सहभागी होते. यावेळी महाप्रसादाने या सोहळ्याचा समारोप झाला.
दरम्यान, या यज्ञ सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता सर्वात्मक गुरुदेव परिवार, महागायत्री यज्ञ समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार अॅड.तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, रामेश्वर ओझा (हैद्राबाद), आनंद भरोसे, भगवानराव वाघमारे, अॅड. न.चि. जाधव, भागवत खोडके, अॅड. रमेशराव दुधाटे गोळेगावकर, विजय उर्फ बंडू सराफ, हभप बाळासाहेब मोहिते, अॅड. ओंकार शिंदे, राजकुमार भांबरे, रमाकांत कुलकर्णी, प्रा.रामभाऊ घाडगे, प्रदीप कुलकर्णी, हभप संतोष खिल्लारे, भगिरथ बद्दर, रविकिरण गंभीरे, पंढरीनाथ घुले, मयुर पोले, शांताताई जैन उखळदकर, सुप्रिया कुलकर्णी, अॅड. लीना चिलवंत, बालासाहेब चौधरी, मल्हारीकांत देशमुख, दत्तराव दैठणकर, अॅड. किरण दैठणकर, अशोक चव्हाण यांच्यासह टाकळी कुंभकर्णी येथील ज्येष्ठ मंडळींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.