स्था.गु.शाखेच्या पथकाने आवळल्या गांजा तस्कराच्या मुसक्या
१लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त; पिंगळी येथे पथकाची कारवाई;एका जणांविरुद्ध ताडकळस पोलीसांत गुन्हा दाखल
पिंगळी ता.२ जुन(वार्ताहर)
परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवारी २ रोजी मोटार सायकल वरून गांजा घेऊन जाणा-या एका गांजा तस्कराच्या मुसक्या आवळून दुचाकीस जेरबंद करत ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कारवाईत सुमारे १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील पिंगळी गावातील जिल्हा परिषद शाळे जवळील पुर्णा रस्त्यावरुन गांजाची तस्करी होत असल्याची खात्री लायक माहीती परभणी स्था.गु.शाखेच्या पथकास मिळाली होती.जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे,पो.नि.विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पिंगळी परिसरात सकाळपासूनच सापळा रचला होता.सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पूर्णा ते पिंगळी गावाकडे जाणारे रोडवरील कन्या जिल्हा परिषद शाळे लगत सार्वजनिक रोडवर गांजा मोटार सायकल वर घेऊन जात असताना पकडले एका इसमास ताब्यात घेतले.त्याची कसुन झडती घेतली असता त्याचे कडे सुमारे ९० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गांजा आढळून आला.पथकाने पकडलेल्या गांजा सह दुचाकी असा १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करून गांजा तस्कर शंकर सोपान लोंढे रा.पुर्णा यास ताब्यात घेऊन ताडकळस पोलीसांकडे स्वाधीन करून त्याचे विरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.या कार्यवाहीत प्रामुख्याने फौजदार वाघमारे, फौजदार बिरादार,पो हे काॅ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, सुर्यकांत फड,हनवते, हनुमान ढगे, गजानन क्षीरसागर, दिपक मुदिराज, ताडकळसचे सपोनि. गजानन मोरे, फौजदार नागरगोजे यांनी सहभाग घेतला.पुढील तपास ताडकळस पोलिस करत आहेत.