सावधान;पूर्णा तालुक्यात बिबट्याने(leopard)दिले दर्शन..

Spread the love

कानेगाव शिवारातील घटना;गणपुर-ममदापूर शिवारात मंगळवारी रात्री वासराचा पाडला होता फडशा; मध्यरात्री वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना..

पूर्णा( प्रतिनिधी)
Purna तालुक्यातील गणपुर-ममदापूर(Ganpur-Mamadapur) शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी लगतच्या एका शेत आखाड्यावर बांधलेल्या एका लहान वासराचा मंगळवारी रात्री अज्ञात हिंस्र पशूने फडशा पाडल्याचे उघडकीस आले होते.परंतु मोकाट कुत्री तसेच तडस,कोल्हा सारख्या पशुने वासराची शिकार केली असावी या कल्पनेने ही गोष्ट ग्रामस्थांनी गांभीर्याने घेतली.मात्र बुधवार ता. २८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास (Purna kanegav)कान्हेगांव शिवारातील नदीपात्रालगत काही रेती तस्करांना बिबट्याने दर्शन दिल्याचे उघडकीस आले आहे.याघटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, एकच धावपळ सुरू झाली आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक (forest department team)घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कान्हेगावांपासून दीड किमी अंतरावर असलेल्या पूर्णा नदीपात्रालगतच्या शिवारात बुधवारी ता.२८ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास काही रेती तस्कर नदीपात्रातून रेती उपसा करून ती वाहनात भरून घेऊन जात असताना चक्क त्यांची वाटच बिबट्याने अडवली. बिबट्याने सदरील वाटेत शिकार करण्याच्या हेतूने आसन करून तो बसला होता. परंतु समोरील टिप्परच्या जोरदार प्रकाशामुळे त्याला समोरचे काही दिसत नसले असावे, टिप्पर मधील लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये त्याची काही व्हिडिओ आणि फोटो काढले व त्यांनी तेथून काढता पाय घेतला परिसरात बिबट्या आल्याचे वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांनी शिवारातील असलेल्या आपापल्या आखाड्यावरील जनावरे घेऊन आपले गाव जवळ केले गावांमध्ये पोलिस पाटील रामभाऊ मोरे यांनी मंदिराच्या लाऊड स्पीकर मधून सर्वांना चेतावणी दिली आहे.
दरम्यान गणपूर- ममदापूर शिवारातून जाणाऱ्या रेल्वे पटरी शेजारी एका शेताखाड्यावर मध्यरात्री कोणत्यातरी अज्ञात हिंस्र पशुनेएका लहानग्या वासराची शिकार केल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले होते. परंतु परिसरातील मोकाट कुत्र्यांनी अथवा अन्य वन्यजीव प्राण्यांनी शिखर केली असावी असा गावकऱ्यांचा समज झाला होता. मात्र गावातील काही लोकांनी वनविभागास याची कल्पना दिली वनविभागाने रात्री उशिरा दिली. ही शिकार वाघ बिबट्या सुदृश्य प्राण्यांनीच केली असावी असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला होता.दरमयान त्यावासराचा फडशा बिबट्यानेच पाडला असल्याचे बुधवारी रात्री कानेगाव शिवारात रेती तस्करांना दिलेल्या दर्शनाने त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. बिबट्या दिसल्याची माहिती मिळतात वनविभागाचे अधिकारी अंगद आयनाळे हे घटनास्थळाकडे आपल्या पथकासह तातडीने रवाना झाले असल्याची माहिती आहे.त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शेत आखाड्यावर नागरिकांनी समुहाने रहावे.न घाबरता पशुधनाची घ्यावी , एकट्याने सुनसान किंवा नदीपात्रालगत फिरु नये असे आवाहन त्यांनी केले बोलताना केले आहे.

You cannot copy content of this page