नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत;परभणीत कशी आहे स्थिती वाचा सविस्तर …
परभणी ता.६(प्रतिनिधी); maharashtra 247 municipal council and 147 nagar panchayat mayor reservation draw: राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज (सोमवार) मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आलेल्या सोडतीत,परभणी जिल्ह्यातील ८ नगरपरिषदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.त्यात ३ पालीकेत सर्वसाधारण महीलासाठी राखीव,३ पालीका सर्वसाधारण,तर एक पालीकेतील नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला जानेवारी२०२५ अखेर पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने हालचालींना गती दिली होती. त्यानुसार नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रक्रिया (ता.६) रोजी मुंबई येथे पार पडली. यामध्ये राज्यातील ३३ नगरपरिषदांपैकी १७ नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती (महिला) आरक्षण निश्चित झाले असून अनेक ठिकाणी महिलाराज येणार आहे.
परभणी जिल्ह्यातील पुर्णा, गंगाखेड,मानवत नगरपरिषद या खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी (open category women) राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर तसेच पाथरी, सोनपेठ, जिंतूर सर्वसाधारण (open)व सेलू (SC) अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
दरम्यान, आपल्या पालीकेचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाणार याची उत्सुकता निवडणुकीसाठी देव पाण्यात घालून बसलेल्या भावी लोकप्रतिनिधींमध्ये होती. आता सोडत जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.राजकीय पक्षांची समीकरणे बदलण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत काहींना फायदा, तर काहींना तोटा होणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील पाच नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या होणार हे निश्चित झाले आहे.