Breking;१३ ऑक्टोंबरला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट व गणांची आरक्षण सोडत..!

Spread the love

भावी सदस्यांची उस्तुकता शिगेला; निवडणूक आयोगाने कार्यक्रम केला जाहीर

पुर्णा ता.१(प्रतिनिधी)राज्यातील **३२ जिल्हा परिषद गटाचे** व **३३६ पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी गट व गणांतील सदस्य आरक्षण सोडत(ता.१३) आॅक्टोंबर रोजी काढण्यात येणार आहे. याबाबतचा कार्यक्रम** राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून ,आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी यासंदर्भातील एका आदेशद्वारे कळवले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पंचायत समितींच्या सभापती पदांसाठीची १० ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ आता १३ऑक्टोंबरला जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ईच्छुक असलेल्या भावीसदस्यांत आरक्षण नेमके कशाला सुटेल याकडे लक्ष लागले आहे.

आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार

६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागांचा प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांकडे पाठवतील.(ता.८) ऑक्टोबर पर्यंत विभागीय आयुक्त हे प्रस्ताव मंजूर करतील.(ता.१०) ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीबाबतची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करतील.(ता.१३) ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची आरक्षण सोडत काढली जाईल.(ता.१४)ऑक्टोबर रोजी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध होईल.नागरिकांना (ता.१४ ते १७) ऑक्टोबर २०२५या कालावधीत प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करता येतील.या हरकतींचा विचार करून विभागीय आयुक्त (ता.२७ ते ३१) ऑक्टोबर २०२५ या दरम्यान अंतिम निर्णय घेतील.त्यानंतर जिल्हाधिकारी (ता.३) नोव्हेंबर २०२५पर्यंत अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करतील.

१३ ऑक्टोबरला पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता गणनिहाय आरक्षणाची सोडत येत्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पालम, पुर्णा ,पाथरी, सोनपेठ, जिंतूर, सेलु, गंगाखेड, परभणी तहसीलदार कार्यालयात पार पडणार आहे.

You cannot copy content of this page