नगरपरिषद निवडणूकसाठी डावपेचांना वेग..!

Spread the love

मतदार यादी हरकतींवरील सुनावणीनंतर वाढणार रंगत

पुर्णा,ता.२८(प्रतिनिधी)ः नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघड वाजत आहे. प्रशासन निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गतिमान झाले आहे.प्रभाग रचना,आरक्षण सोडत, मतदार याद्यांचा कार्यक्रम,मतदान केंद्रांची यादी व केंद्रनिहाय मतदार याद्यांची घोषणा करण्यात येणार असल्यामुळे नोव्हेंबर महीन्यात निवडणूकीची प्रत्यक्ष घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील पाच वर्षांपासून झाल्यानसल्याने निवडणूक आयोगाने दिड महिन्यांपासुन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु कार्यक्रमामुळे राजकीय पक्षातील इच्छुक अंग झटकून कामाला लागले आहेत.यामुळे शहरातील वार्डावार्डात राजकीय वातावरण तापले आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झडत आहेत. राजकीय दिवसेंदिवस वाढत चालली आहे.पुर्णा नगर परिषदेच्या प्रारूप मतदार यादीच्या हरकतींवरील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी (ता.२८) रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान इच्छुक उमेदवार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भूमिका मांडली. यंदा नागरिकांनी मतदार यादीत झालेला गोंधळ, दुरुस्ती तसेच नावे नोंद न होणे, या बाबींविषयी हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेचा पुढील टप्पा आता ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रारूप मतदार यादी जाहीर होण्याचा असून, त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी व केंद्रनिहाय मतदार याद्यांची घोषणा करण्यात येणार आहे. अंतिम यादीत किती मतदार असतील, कोणते क्षेत्र कोणत्या प्रभागात समाविष्ट असेल, यावर आता इच्छुक उमेदवारांची रणनीती ठरणार आहे.

——————————–

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुक लांबणीवर पडण्याची शक्यता.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी बाबत मिळत असलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयारी करण्याती मुदत राज्य निवडणूक आयोगाकडून वाढण्यात आली आहे. आधी २७ ऑक्टोबरपर्यंतची मतदार यादी ही अंतिम करायची होती. मात्र आता ही प्रक्रिया १२ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ३ नोब्हेंबर पर्यंतच्या मतदार याद्या ह्या अधिप्रमाणित केल्या जातील. तसेच १२ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही वेळ लागणार असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडू शकतात.

सुमारे १८०० हरकतींवर सुनावणी

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशा नुसार पुर्णा नगर परिषद निवडणूक २०२५साठीची प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. प्रारंभी ८ ते १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याचा कालावधी निश्चित केला होता. मात्र आयोगाच्या १३ ऑक्टोबरच्या सुधारित आदेशानुसार कालावधी वाढवून १७ ऑक्टोबर २०२५ करण्यात आला. या वाढीव कालावधीत १८०० हरकतींवर सुनावणी घेण्यात आली.

You cannot copy content of this page