फौजदार माधवअण्णा लोकुलवार यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस सेवादलातील ३८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सोमवार ता. ३१ मार्च रोजी परभणी पोलिसात कार्यरत असलेले फौजदार माधवअण्णा लोकुलवार हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या मित्र मंडळाकडून १ एप्रिल रोजी सेलु येथील साई नाट्यगृह येथे सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. परभणी पोलीस दलात आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, कर्तव्य कठोर अधिकारी, एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व, म्हणून ख्याती मिळवलेले फौजदार माधव अण्णा लोकुलवार त्यांनी परभणी पोलीस दलात तब्बल ३८ वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावली आहे. ते ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत .त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या चाहत्यांनी जिल्ह्यातील सेलू येथे साई नाट्यगृह महेश नगर सेलू तारीख १ एप्रिल सायं ५ वाजता ‘सेवापूर्ती गौरव समारंभाचे’ आयोजन केले असुन, या कार्यक्रमास जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादीदी बोर्डीकर (सामोरे), निवृत्त पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर , मा.आ.हरिभाऊ काका लहाने,अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपजिल्हाधिकारी सेलू संगीता सानप ,मानवत तहसीलदार पांडुरंग माचेवाड, आर्य वैश्य महासभेच्या महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गादेवार ,सेलू तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्यासह पोलीस खात्यासह सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माधव अण्णा लोकुलवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page