महाकुंभमेळा-२०२५(Mahakumbha)भाविकांसाठी दमरे कडून विशेष रेल्वे
संभाजीनगर,नांदेड,काचिगुडा, सिकंद्राबाद स्थानकावरून धावणार गाड्या;प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन
पूर्णा(प्रतिनिधी)
उत्तरप्रदेशतील (Prayagraj)प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळाला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड,छ.संभाजीनगर- पटणा-छ.संभाजीनगर,काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद चार विशेष रेल्वे(Special Train)प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येणार असल्याची घोषणा दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे.
कुंभमेळा हा भारतातील चार पवित्र नद्यांवर आयोजित केला जातो. हरिद्वार, प्रयागराज,नाशिक आणि उज्जैन येथे दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो.यावर्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३जानेवारी ते २६ फेब्रु या कालावधीत होणार आहे. या मेळ्यासाठी सरकारने वाहतूक व्यवस्था आणि महिला व वृद्धांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.त्यानुसार दक्षीण मध्य रेल्वेच्या वतीने महाकुंभ प्रयागराजला जाण्यासाठी चार विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत.त्यामध्ये गाडी क्रमांक ०७०९९/०७१०० नांदेड ते पटणा ही विशेष २२ डब्यांची गाडी नांदेड येथून दि.१३ फेब्रु रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि पूर्णा,अकोला,खंडवा, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन,दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी स.१०;३० वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात ही गाडी दि१५ फेब्रुवारी रोजी दुपारी १५:३० वाजता सुटेल दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ४;३० वाजता पोहोचेल.गाडी क्रमांक ०७१०१/०२ छ.संभाजीनगर-पटणा-छ.संभाजीनगर ही विशेष गाडी संभाजीनगर येथून दि.१९ फेब्रु आणि २५ फेब्रु रोजी संध्याकाळ ७ वाजता सुटेल आणि परभणी,पूर्णा,अकोला,खंडवा,इटारसी, माणिकपूर, प्रयागराज छिवकी,पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०;३०वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात ही गाडी पटणा येथून दि.२१आणि २७ फेब्रु रोजी दुपारी ३;३० वाजता सुटेल मागनिच संभाजीनगर येथे २३,२९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७;४५ वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असणार आहेत.गाडी क्र. ०७१०३/०४काचीगुडा-पटणा- काचिगुडा ही २२ डब्यांची गाडी काचीगुडा येथून दि.२२फेब्रु रोजी दु.४;४५ वाजता सुटेल आणि निजामाबाद,नांदेड,पूर्णा,अकोला,खंडवा,इटारसी, जबलपूर,माणिकपूर,प्रयागराज छिवकी,पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी १०;३०वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात ही गाडी दि.२४ फेब्रु रोजी सकाळी ११;३० वाजता सुटेल काचीगुडा येथे दिनांक २६फेब्रु सकाळी ७ वाजता पोहोचेल.तर गाडी क्र.०७१०५/०६सिकंद्राबाद-पटणा-सिकंद्राबाद ही विशेष गाडी सिकंद्राबाद येथून ७ फेब्रु रोजी संध्या ५वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड,नांदेड,पूर्णा,अकोला, खंडवा, माणिकपूर,प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी स.१०;३०वाजता पोहोचेल.परतीच्या प्रवासात ही २२ डबे असलेली गाडी पटणा येथून ९ फेब्रुवारी रोजी दु.३;३० वाजता सुटेल आणि ११फेब्रु स. ११:३० वाजता पोहोचेल, या गाडीत २० डब्बे असणार आहेत.












