बीड(परळी)/प्रतिनिधी;New MIDC Newsराज्यातील उद्योग विभागाने छत्रपती संभाजीनगर विभाभागात नवीन ११ एमआयडीसीं विकासीत करण्याचा निर्णय घेतला आहे.यात बीड जिल्ह्यातील पिसेगांव, कामखेडा, आष्टी- पिंप्री,सिरसाळा टप्पा २ (परळी वैजनाथ),कळवटी, लमान तांडा (अंबाजोगाई),वडवणी या गावात एम.आय.डी.सी उभारली जाणार आहे.उद्योजकांची मोठ्या प्रमाणात मराठवाड्यालाच पसंती देण्याची शक्यता लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात एकूण ११ नवीन औद्योगिक वसाहती प्रस्तावित करण्यात आल्या असल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्यातील प्रस्तावित करण्यात येणाऱ्या एम आय डी सी मध्ये पिसेगाव (ता. केज) येथिल सरकारी जमीन १६ हेक्टर. प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित.
--कामखेडा (बीड)सरकारी जमीन ८२.४७ हेक्टर. भूनिवड समितीची पहाणी झाली. प्रस्ताव मंजुरीसाठी एमआयडीसी मुख्यालयास सादर.
--आष्टी- पिंप्रीसरकारी जमीन १८.३५ हेक्टर. खासगी २७.४५ हेक्टर. एकूण ४५.८० हेक्टर. उच्चाधिकार समितीची मंजुरी. सर्वेक्षण करण्यात आले.
--सिरसाळा टप्पा २ (परळी वैजिनाथ)सरकारी जमीन ५० हेक्टर. उच्चाधिकार समितीची मंजुरी.
--कळवटी, लमान तांडा (अंबाजोगाई) जमीन ८० हेक्टर. कार्यकारी अभियंता यांचा अहवाल येणे बाकी आहे.
--वडवणी एमआयडीसीजमीन ५० हेक्टर, भूमिअभिलेख आणि एमआयडीसी यांची संयुक्त मोजणी करणे बाकी.