पूर्णेत महावितरणचा २० वा वर्धापन दिन साजरा

Spread the love

शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन;सुरक्षेसह विविध योजनांची दिली माहिती; पर्यावरण समतोल राखण्याचेही आवहान

पूर्णा ता.५ जुन(प्रतिनिधी)

महावितरणचा २० वा वर्धापन दिन व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पूर्णा उपविभागामार्फत गुरुवारी ५ जून २०२५ रोजी’वीज सुरक्षा व पर्यावरण रॅली काढण्यात आली.यावेळी नागरिकांमध्ये वीज सुरक्षेबाबत व पर्यावरण समतोल राखण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

पूर्णा येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयांतर्गत उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचा २० वा वर्धापन दिन,तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत अभियंता अविनाश रामगीरवार, अभियंता प्रितम वसमतकर, अभियंता सचिन घोडके, अभियंता गौरव पाटील, यांच्या सह महावितरण कंपनीचे जनमित्र,सह लाईनमन,यंत्र चालक, कंत्राटी कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.सकाळी डॉ आंबेडकर नगर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली.सिद्धार्थ नगर, विजयनगर, कुंभार गल्ली, महादेव मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , मुख्य बाजारपेठेतुन, टिपाईट येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.यावेळी शहरातील चौकाचौकात गल्ली बोळात जाऊन महावितरण कंपनीच्या वतीने नागरिकांत सुरक्षेचे महत्त्व सांगण्यात आले.तर सार्वजनिक ठिकाणी पोस्टर, बॅनर लाऊन जनजागृती करण्यात आली.सुर्यघर योजना,वीज बचत वीज चोरी, वीजबिल भरणा, पर्यावरणाचा समतोल राखण्याचेही आवहान करण्यात आले.

You cannot copy content of this page