रोहीत्रा जवळील तारांत स्पार्कींग;शेतकऱ्यांचा ३ एकरांंवरील ऊस जळून खाक..
पूर्णा तालुक्यातील न-हापूर शिवारातील घटना;साडेचार लाखांचे नुकसान
पूर्णा(प्रतिनिधी)
शेत शिवारातील रोहीत्रा जवळील जुन्या झालेल्या तारांमध्ये स्पार्कींग होऊन न-हापुर शिवारातील ३ एकरांवरील उभ्या ऊसाला मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत चुडावा येथिल एका शेतक-याचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पूर्णा तालुक्यातील न-हापुर शिवारात चुडावा येथिल शेतकरी गणेश साहेबराव देसाई व पंडीत साहेबराव देसाई या भावडांची गट नंबर ३२ मध्ये शेत जमीन आहे
शेतात विहीर तसेच कालव्याचे पाणी मिळत असल्याने त्यांनी गतवर्षी आपल्या चार ते पाच एकरावर ऊस लागवड केली होती.येत्याकाही दिवसांत ऊसाची तोंड होणार होती.दरम्यान मंगळवारी ३१ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतात असलेल्या रोहीत्रा जवळील तारांत स्पार्कींग होऊन त्यांचा ऊस पेटला ही घटना लक्षात येईपर्यंत ३ एकर उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून ऊसाची राख रांगोळी झाली होती.घटनेत देसाई बंधुचे सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.गणेश देसाई व त्यांच्या बांधुनी याबाबत चुडावा पोलिस ठाण्यात, महावितरण कंपनीच्या कार्यालयात जळीत प्रकरणी तक्रार दाखल केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी वर्गातुन रोष..!
पूर्णा येथिल महावितरण कंपनीकडून होत असलेल्या हालगर्जीपणाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. लोबंकळणा-या तारा, जुनाट वाहीन्यांत घर्षण होऊन शेतातील पिके जळून लाखों रुपयांचे नुकसान होत आहे.सरत्या वर्षात विद्युत वाहीन्यात घर्षण होऊन आग लागण्याच्या ३० ते ४० घटना घडल्या आहेत.तरीही झोपेत असलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होताना दिसत नाही.त्यामुळे शेतकरी वर्गातुन महावितरण विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.












