आ.बाबुराव कोहळीकरांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या नुसार गुन्हा दाखल करा
पूर्णा, ता. २८ (प्रतिनिधी) :
बातमी का छापली म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी .अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांना संज्या तुला संपुन टाकेल अशा आवाच्च भाषेत शिवीगाळ करत भ्रमणध्वनी वरुन जिवे मारण्याची धमकी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दिली. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारास जिवे मारण्याची धमकी देवून संपवण्याची भाषा करणाऱ्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर योग्य ती करवाई करावी. त्यांच्या या अशा कृत्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका व शहर शाखेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. फौजदार रेखा यांच्या कडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे असलेले निवेदन सुपुर्द करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मोहम्मद मुजीब हाजी खुरेशी, जिल्हा सरचिटणीस सतीश टाकळकर, शहराध्यक्ष मोहन लोखंडे, तालुका कार्याध्यक्ष गजानन हिवरे, शहर कार्याध्यक्ष मोहम्मद अलीम, तालुका सरचिटणीस मोहम्मद अनिस बाबुमीया, शहर सरचिटणीस सुशिलकुमार दळवी, कैलास बलखंडे, अनिल आहिरे, जगदीश जोगदंड, संपत तेली, प्रदीप कदम, शेख असद आदी उपस्थित होते.