परभणीतील विकास कामे मार्गी लावा आ.डाॅ.राहुल पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
समांतर पाणीपुरवठा व भूमिगत गटार, क्रीडा संकुल, सायन्स पार्क,शहरातील रस्ते,विविध योजना मार्गी लावा
परभणी(प्रतिनिधी)
परभणी विधानसभा मतदारसंघातील सह शहरातील समांतर पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेसह अन्य रखडलेली कामे मार्गी लावावेत, अशी मागणी आ. डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
परभणीत कृषी विद्यापीठातील बैठकीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी दौर्यावर आले असता आ. पाटील यांनी फडणवीस यांची लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागत केले आणि त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन मतदार संघातील विविध विषयावर चर्चा केली. सरकारने वेळोवेळी समांतर पाणीपुरवठा योजना व भूमिगत गटार योजनेची घोषणा केली परंतु, अद्याप या योजनांची पूर्तता झाली नाही, शहरात भूमिगत गटार योजना नसल्यामुळे सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, यामुळे रस्ते खराब होत आहेत, असे सांगत सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार योजनेला,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारक जागेवरील अतिक्रमण काढुन स्मारकास निधी द्यावा , रखडलेल्या नाट्यगृहास निधी द्यावा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तालुका क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न सोडवावा,सायन्स पार्क उभारण्यात येत आहे या भरिव नधी देण्यात यावा.प्रस्ताव मंजूर आहे. तसेच शहरात पक्के आणि मजबूत रस्ते नाली बांधकामसाठी भरिव निधी द्यावा, सोबतच शहरातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी समांतर पाणी पुरवठा योजनेला देखील भरीव निधी देऊन ही योजना पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, या विषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.