मतदारसंघातील भगिनींच्या सदैव पाठीशी- आ. डॉ.रत्नाकर गुट्टे

Spread the love

आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळा;पूर्णेतील कोळीवाडा येथे लाडक्या बहिणीसाठी साडी वाटपाचा कार्यक्रम

पूर्णा ता.१४(प्रतिनिधी)माय माऊली महिला भगिनींनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासांमुळे मागील ६ वर्षापासून गंगाखेड मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहे. मतदार संघातील माझ्या भगिनींच्या अडी- अडचणी सोडविण्यासाठी मी बांधील आहे.कुठलेही, कसलेही काम असो त्यांनी फक्त आवाज द्यावा मी त्यांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून खंबीरपणे उभा राहील. माझ्याकडे सत्ता असो वा नसो त्यांना मी कधीही अंतर देणार नाही असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

    पूर्णा शहरातील कोळीवाडा येथे संजय गांधी निराधार समितीचे सदस्य तथा मित्र मंडळाचे कार्यकर्ते किशोर सूर्यवंशी यांनी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कोळीवाडा परिसरात (ता.१२) रोजी लाडक्या भगिनींसाठी साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसंगी आमदार गुट्टे हे बोलत होते. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हरिभाऊ कदम ,प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक गणेश भाऊ कदम, तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, तालुकाध्यक्ष सुभाष देसाई, शहराध्यक्ष अँड .राजेश भालेराव, सेनाजी माटे विश्वनाथ होळकर,अनिल बागल ईश्वर ठाकूर, श्री कदम, असलम पठाण, श्रीनिवास तेजबंद आदींची उपस्थिती होती.

आ. डॉक्टर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शहरांसह तालुक्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, मूकबधिर विद्यार्थ्यांना भोजन वाटप करण्यात आले. यावेळी साडी वाटप कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते सुमारे ३०० हुन अधिक महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश सूर्यवंशी,राजु भंगे, भिकाजी भंगे, दुर्गादास दारकोंडे,तुकाराम सोळंके,मोहन सोळंके, खंडू भंगे,गोविंद भिसे,नवनाथ जंगले, गोपी रोनटे,विठ्ठल भिसे,सोनाजी भिसे,भंगे किसनराव सोळंके,बालाजी सोळंके,चांदु चुनोडे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सूर्यवंशी तर आभार आयोजक किशोर सूर्यवंशी यांनी मानले.

You cannot copy content of this page