‘वंदेभारत’ एक्सप्रेसच्या उद्घाटन सोहळ्यातुन खा.संजय जाधव यांना डावलले..!

Spread the love

वंदेभारतच्या नांदेड पर्यंतच्या विस्तारासाठी परभणीचे खा.संजय जाधव यांनी केले होते प्रयत्न

पूर्णा ता.२५(प्रतिनिधी);परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या पाठपुराव्याने जालना पासुन नांदेड पर्यंत वंदेभारत एक्सप्रेसचा विस्तार झाला. मंगळवारी (ता.२६) रोजी 'वंदेभारत' एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा नांदेड रेल्वे स्थानकावर होतो आहे.मात्र या सोहळ्यास रेल्वे प्रशासनाने विशेष आमंत्रित म्हणून,खा.जाधव यांना डावलल्यामुळे आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
मराठवाड्यातील जनतेच्या हितासाठी बहुचर्चित जालना-मुंबई 'वंदेभारत एक्सप्रेस'चा विस्तार नांदेड रेल्वे स्थानकापर्यंत करावा अशी मागणी परभणीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपनेते तथा खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांनी लोकसभेत लाऊन धरत एक लक्षवेधी सूचना ही लावली होती .त्यानंतर रेल्वे बोर्डाने ही गाडी नांदेड पर्यंत विस्तार करण्याचे जाहीर केले. गाडीचा विस्तार होताच अनेकांनी श्रेयवाद याचा केला परंतु वास्तवीक पहाता यांचे श्रेय हे खा.जाधवांनाच आहे.आज मंगळवारी (ता.२६) रोजी ही उद्घाटन विशेष गाडी नांदेड येथुन मुंबईसाठी धावणार आहे.या गाडीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड रेल्वे स्थानकावर करण्यात आले असुन कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार यांनाच आमंत्रित करण्यात आले आहे.
खरे पाहिले तर खासदार संजय जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही गाडी नांदेड येथुन सुरु झाली आहे, तरी मात्र उद्घाटन सोहळ्यात खासदार जाधव यांना रेल्वे प्रशासनाने विशेष आमंत्रित म्हणून आमंत्रित न करणे त्यांना निमंत्रण पत्रिकेत साथ न देणे हा रेल्वे प्रशासनाने त्यांच्याशी उघडपणे केलेला पक्षपात असल्याचे स्पष्ट होत असल्याची जोरदार चर्चा परभणी जिल्ह्यात सुरू आहे. “जनतेच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान करण्याऐवजी दुय्यम वागणूक देणे, ही प्रशासकीय ,राजकीय संस्कृतीला शोभणारी बाब नाही,” असा सूर देखील स्थानिकांमध्ये उमटला आहे.

वंदेभारतच्या नांदेड पर्यंतच्या विस्ताराचा प्रश्न खा.जाधव यांनी लाऊन धरला तो रेल्वे मंत्रालयाने मंजुर केला गाडीचे मंगळवारी सकाळी उद्घाटन होणार आहे.रेल्वे प्रशासनाने खा.जाधव यांना या सोहळ्यास आमंत्रित न केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून,आता खा.जाधव व त्यांचे समर्थक काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page