एमटीएस ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत विद्या प्रसारणी शाळेचे घवघवीत यश;३८ विद्यार्थी चमकले

Spread the love

पूर्णा ता.२(प्रतिनीधी)शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था विद्या प्रसारणी सभेची प्राथमिक तसेच हायस्कूल शाळा पूर्णा येथील विद्यार्थ्यांनी गतवर्षी झालेल्या एमटीएस ओलंपियाड ( महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन )परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.महाराष्ट्रातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील टॅलेंट शोधून त्यांच्या बुद्धीला चालना मिळावी,भविष्यात अशाच परीक्षेमधून हे चिमुकले बालक उद्याचे भारताचे उत्तम नागरिक तयार व्हावेत. आदर्श व्यक्तिमत्व तयार व्हावेत त्यातून उज्वल भारत निर्माण व्हावा यासाठी अशा विवि धस्पर्धा परीक्षेचे आयोजन केले जाते. अशाच महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन सारख्या परीक्षेमध्ये हजारो विद्यार्थी सहभागी होतात.या वर्षी जानेवारी २०२५या महिन्यात झालेल्या एमटीएस परीक्षेमध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी यात यश संपादन केले आहे. शाळेतील २८विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, १३ विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल, तसेच १० विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळविण्यात यश मिळालेलं आहे.

“विद्यार्थ्यांनी अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग नोंदवून स्वयं अध्यनाने उज्वल यश मिळवावे व प्रत्येकाने भारताचे सुसंस्कारीआदर्श नागरिक बनावे. कारण हे आजचे अनेक विध्यार्थीच आदर्श भरताचे खरे भाग्यविधीते आहेत,”अशी भावना मुख्याध्यापक शिवदर्शन हिंगणे सर यांनी व्यक्त केली.आज महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनय वाघमारे साहेब, उपाध्यक्ष भीमराव कदम, सेक्रेटरी श्रीनिवास जी काबरा, सर्व संचालक मंडळ तथा हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एल. उमाटे, जेष्ठ शिक्षक भगवान ढोणे, पी.डी.आहेर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी सर्व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री शिवदर्शन हिंगणे हे होते. वि. प्र.हायस्कुल विभागाचे पर्यवेक्षक श्री भगवानराव ढोणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष बच्चेवार सर यांनी केले. आभार श्री शिवप्रसाद ठाकूर सर यांनी या विध्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

You cannot copy content of this page