हातोड्याचे धाव,धारधार शस्त्राचे वार;परभणीत तरुणाची निर्घुण हत्या
दोघेजण ताब्यात;नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
परभणी/प्रतिनिधी:
रस्त्यावर उभारलेल्या तरुणावर हातोड्याचे धाव,धारधार शस्त्राचे वार कर निर्घुण हत्या केल्याची घटना परभणी
शहरातील जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात शुक्रवार दि. ९)रोजी रात्री घडली. या हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल आर्वीकर असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, विशाल आर्वीकर हा तरुण शुक्रवारी रात्री नऊ – साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात परिचितांना बोलत थांबला होता. यावेळी तोंडाला बांधलेले चौघेजण मोटरसायकलवर धारदार शस्त्र घेऊन विशाल थांबलेल्या ठिकाणी आले. त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने सपासप करत त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर चारही आरोपींनी मोटरसायकलवर स्वार होऊन तेथून पळ काढला. दरम्यान यावेळी नागरिकांचा मोठा जमाव घटनास्थळी उपस्थित झाला. विशाल आर्वीकर यास तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून विशाल आर्वीकरचा मृत्यु झाल्याचे सांगितले.
या प्रकरणी वर्षा गिराम यांच्या फिर्यादीवरून नानालपेठ पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी पसार झालेल्या चार आरोपींपैकी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरिक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक खज्जे हे करीत आहेत.
____________________