पूर्णेत किरकोळ वादातून तरुणाचा खून

Spread the love

कोळीवाडा परिसरातील घटना;तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पूर्णा ता.११(प्रतिनिधी). किरकोळ कारणांवरून झालेल्या मारहाणीच्या घटनेत एका २७ वर्षीय तरुणाचा खुन झालेची घटना पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिर जवळ ता.१० रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेख सलमान शेख गुलाब (वय २७) रा.कोळीवाडा ता.पूर्णा असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.मयताचे भाऊ इम्रान गुलाब शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे की, फिर्यादी गुरुवारी ता.१० जुलै रोजी दिवसा मजुरीचे काम करुन सायं घ जेवण करुन गल्लीतील खंडोबा मंदीर समोर मित्रांसोबत बोलत बसलो असता  समजले की, दुपारी किरकोळ वादाच्या कारणा मयत  सलमानचे कोळी वाडयातील गणेश जाधव व सुरज जाधव यांचे सोबत वाद झाला होता परंतु मित्रांनी मिटवला.त्याच वेळी परिसरात थोडे अंतरावर भांडणाचा आवाज आल्याने  तेथे जाउन पाहीले असता त्या ठिकाणी फिर्यादीचा भाऊ सलमान यास सुरज जाधव, गणेश जाधव व शंकर पांढरे हे शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण मारहाण करत होते. जवळ जावुन सोडवा सोडव करे पर्यंत गणेश जाधव याने माझे भावाचे डोके हे तेथील सवारीचे आलावा यास जोरात आदळवले त्यामुळे तो खाली पडला असता त्यास त्यांच्या तावडीतून सोडवून उचलुन घरी घेवुन गेलो तो नसल्याने एका अॅटोने सलमान यास पुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात घेवुन गेलो असता डाॅक्टरांनी तपासणी करून सलमान  मयत झाला आहे असे सांगीतले.यानंतर घडलेल्या घटनेप्रकरणी

मयताचा भाउ शेख इम्रान शेख गुलाब याने गणेश जाधव, सुरज जाधव, शंकर पांढरे सर्व रा. कोळी गल्ली यांच्या विरोधात पुर्णा पोलीस ठाण्यात किरकोळ वादातून लाथा बुक्याणे मारहाण करुन त्याचे डोके सवारीच्या आलाव्यास जोराने आदळुन त्यास गंभीर जख्मी करुन त्याचा खुन केला आहे अशी फिर्याद दिली आहे.त्यावरुन पूर्णा पोलीसात गुरनं २९९/२०२५ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हे करत आहेत.

You cannot copy content of this page