नांदेड येथील विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद..!

Spread the love

पावसाने धावपट्टीवर पडले जागोजागी खड्डे;प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाचा निर्णय

नांदेड ता.२२(प्रतिनिधी): Nanded Airport Closed Newsमागील काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात अतीवृष्टीचा पाऊस पडला या(Heavy Rainfall) मुसळधार पावसामुळे शहरातील Shri GuruGovind Singhji Airport Nanded श्री. गुरुगोविंद सिंघजी विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर मोठं मोठे खड्डे पडुन अतोनात नुकसान झाले आहे.या धावपट्टीवर विमानांची वाहतूक सुरक्षित नसल्याने, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे विमानतळ आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय विमान प्राधीकरणाने घेतला असल्याचे माहिती आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण झाल्यावरच विमानसेवा पूर्ववत सुरू होईल. मात्र, या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. आधी नुकसानीचा अंदाज घेऊन निधीसाठी प्रस्ताव तयार केला जाईल, त्यानंतर निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण होईल आणि मगच प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू होईल असे कळवले आहे. या प्रक्रियेतील विलंबामुळे विमानसेवा कधी सुरू होईल, याची सध्यातरी कोणतीही शास्वती नाही.
मात्र या अचानक घेतलेल्या बंदमुळे प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत, कारण हे विमानतळ नांदेडसह लातूर,परभणी, हिंगोली,यवतमाळ,तसेच आदिलाबाद आणि निजामाबाद येथील लोकांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे.नांदेडहून पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर आणि अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांसाठी नियमित विमानसेवा उपलब्ध होती.

You cannot copy content of this page