नांदेड-छ.संभाजीनगर मार्गावर रेल्वेचा लाईन ब्लॉक;3 तास उशिरा धावणार रेल्वे

Spread the love

छ.संभाजीनगर-गुंटूर-,छ.संभाजीनगर एक्सप्रेस अंशतः रद्द,

पूर्णा(प्रतिनिधी)

छ.संभाजीनगर- जालना दरम्यान बी. सी.एम.मशीन ने रेल्वे पटरी ची देखरेख दुरुस्ती करण्याकरिता नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने 31 मे ते, 20 सप्टेंबर दरम्यान तब्बल 03 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले असुन, यामुळे छ.संभाजीनगर-गुंटुर-छ.संभाजीनगर एक्सप्रेस काही दिवस अंशतः रद्द करण्यात आली आहे.

जालना छ.संभाजीनगर दरम्यान घेण्यात येणा-या लाईन ब्लॉक मुळे गाडी क्रमांक (17254 छ.संभाजीनगर-गुंटूर-,छ. संभाजीनगर एक्सप्रेस) 31 मे ते, 20 सप्टेंबर दरम्यान छ.संभाजीनगर-जालना दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी जालना ते गुंटूर अशी धावेल. हि गाडी जालना येथून तिची नियमित वेळे सायंकाळी 5 वाजता सुटेल तर गाडी क्रमांक (17253 गुंटूर-छ.संभाजीनगर एक्सप्रेस) 30 मे ते, 19 सप्टेंबर दरम्यान दरम्यान जालना-छ.संभाजीनगर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तारखेस ही गाडी गुंटूर ते जालना अशी धावेल अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाचे जनसंपर्क कार्यालय राजेश शिंदे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page