‘धनुष्यबाण’हाती घेत विशाल कदमांचा ठाकरे गटाला’अखेरचा ‘जयमहाराष्ट्र’..!
नांदेड येथे शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला पक्ष प्रवेश सोहळा
पूर्णा(प्रतिनिधी)
परभणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आपल्या समर्थकांसह धनुष्यबाण’ हाती घेत ठाकरे गटाला’ अखेरचा ‘जयमहाराष्ट्र.!’ करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.गुरुवारी ता.६ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.यावेळी नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आ.हेमंत पाटील, आ.बालाजी कल्याणकर, आ.बाबुराव कदम कोहळीकर,आ. संतोष बांगर,मा.आ. हरिभाऊ काका लहाने,आनंद भरोसे आदीं लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होते.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणा-या जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी १ लाख १५ हजार विक्रमी मते मिळूनही ते या निवडणुकीत पराभूत झाले होते. अनेक दिवसांपासून ते शिंदे गटात पक्ष प्रवेश घेणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा पक्षाला सुपूर्द करुन त्यांनी हाती धनुष्यबाण घेतला आहे.त्यांच्या सोबत शिवसेना ठाकरे गटासह शेकडो आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांचा समावेश आहे.कदम यांच्या पक्ष प्रवेशामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होणार असल्याचे देखील ऐकायला मिळत आहे.
पक्ष प्रवेशानंतर मोठी जबाबदारी..!
ठाकरे गटात मानाचे जिल्हा प्रमुख पद भुषवत असलेल्या तसेच दोनवेळा विधानसभेची निवडणुक लढवणा-या विशाल कदम यांनी ठाकरे गटाला जयमहाराष्ट्र करत हाती धनुष्यबाण घेतला आहे.परभणी जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाची म्हणावी तशी ताकद नव्हती परंतु कदम यांच्या रुपाने शिंदे सेनेला नव्या दमाचा तरुण तडफदार चेहरा मिळाल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. जिल्ह्यातील पक्ष संघटनेला मजबूती तसेच बळकटी आणण्यासाठी त्यांना मोठी जबाबदारी शिंदे गटाकडून देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी मिळत आहे.












